Tuesday, 2 December 2008

(कधीच का नाही?)

जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न)


का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही
गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही

त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या
वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही

सलवार ही फुलांची मद झुलवीत येते
मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही

डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या
सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही

जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्‍याच सार्‍या
का भाव तू दिलेले वठले कधीच नाही

पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते
का सोडणे तुला मज जमले कधीच नाही

चेतन

(काही कविता का प्रश्न ?)

रामदास भाउंच्या 'काही कविता' वाचल्यापासून मनात होतं की याच्या एक दशांश जरी काही लिहू शकलो तरी चिक्कार आहे. नंतर मग या कवितांवर चतुरंगांची चॉफेर टोलेबाजी आली.

आज दोन दिवस बातम्या आणि मिपावरील चर्चा वाचून डोक सुन्न झालं होतं. मनात आलं काहीतरी लिहावं आणि हे लिहलं. सद्यस्थिती पाहता याला वडंबन म्हणता येईल का याबद्दल साशंक आहे असो.

निर्ढावलेला बंडखोर
मुखडा आतंकाचा.
हवातसा हल्ला केल्यावर
हरामखोर हैवान झाला.
हक्काची मुंबई
मारायला मोकळा.
---------------
अल्लाद दाउदमिया आय्एस्आय् चा भामटा.
कराचित लपून पुन्हा पुन्हा
फोफावला लालकाळा
आता,
देशभर तंगडी तंगडी
------------------------
बारीक सारिक स्फोटांनी
देशातले एकेक शहर हादरवून
त्यानी विचारलयं
ठकूबाई,ठकूबाई,
जाणार कुठे गं
आता गोळ्या झाडल्यावर.
--------------------------------
एकेक वर्ष कोसळत गेलं
लोकलपासून ताजपर्यंत
पत्त्याच्या बंगल्यासारखं.
आबा पुरे झाल्या का
फुटकळ मुलाखती वांझोट्या.?

(अस्वस्थ) चेतन

Wednesday, 26 November 2008

असेच काहीतरी

एक असाच काहीतरी अस्पष्ट विचार बर्च दिवस मनात चालला होता आज तो लिहुन काढला एव्हढच्


तुझी आठवण सांजवेळी,
मन माझे कातर करते |
हुदयातुन पुढे सरकत,
वेळीअवेळी डोळ्यात दाटते ||

पोटपाण्याच्या नित्यक्रमात,
काही तास निघुनही जातात |
कामाच्या गडबडगोंधळात,
काहि आठवणी विझुन जातात ||

दुपारच्या गडबडी नंतर,
संथ झुलत संध्याकाळ येते |
परत एकदा स्म्रुती जागवुन,
भावनांच्या म्रुगजळात नेते ||

पुन्हा मन पेटुन उठतं,
समंधालाही उधाण येतं |
चंद्र येतो सोबतिला अन्,
झुळुक वार्‍याची मंद वाहते ||

या मंद वार्‍याबरोबर,
आठवणीही कुंद होतात |
मला एकटाल्याच सोडुन,
कुठल्याकुठे वाहुन जातात ||

थोडे दिवस पुन्हा शांतता,
मिळत नाही कामातुन वेळ |
मोकळे झाल्यावर परत एकदा
दाटुन येते कातरवेळ ||

आठवणिंचा खेळ सारा,
येते भरती ओहोटी |
किनारे किती झिजावे,
बांधाची खरी कसोटी ||

लाटांच्या या मुक्त माराने,
किनारे टोकदार होतात |
थोडासा जरी धक्का लागला,
हातपाय कापत नेतात ||

संकटांची सोडून चींता,
सोडुन उधाणाची भिती ||
काढून टाक संरक्षक भिंत,
मिसळून जा लाटेसमती ||

सोडणार नाहीत आठवणी तुला,
परत येतील लाटेवरती |
अथांग मनाच्या सागरात,
क्वचित मिळतात माणिकमोती ||

येत राहते भरती ओहोटी,
पुन्हा गर्जून फेसाळ्ण्यासाठी |
वळुन मागे पाहता दिसतील,
कडूगोड आठवणगाठी ||

येइल परत पुन्हा संध्याकाळ,
आठवणिंना घेउन संगे |
मुक्त करुनी आठवणगाठी,
सोडुन दे त्या वार्‍यासंगे ||

चेतन

गणेशा (लवंगलता)

गुरुवर्य धोंडोपंतांच्या लवंगलता छंदातिल रचना वाचुन खरच येड लागले.

म्हणलं आपण पण एक प्रयत्न करावा (ग्रुहपाठ अनुष्टभ फारच जड आहे)

माझा हा एक प्रयत्न जाणकारांनी चुका किंवा बदल जरुर सुचवावेत.

दर्शनाने गणेशाच्या,
मन होई शांत |
राहो तुझी क्रुपाद्रुष्टी,
अनादि अनंत ||

प्रसन्न ही तुझी मुद्रा,
मन आनंदते |
पाणिदार डोळ्यांमध्ये,
भान हरपते ||

आगमन होता तुझे,
घरी सणवार |
ढोलताशे गजरात,
चैतन्य अपार ||

लाल फुले जास्वंदीची,
माथ्यावर दुर्वा |
विघ्नहर्ता गणेशा तू,
बुध्दी देइ सर्वा ||

आरती तुझी गाईन,
पूर्ण मनोभावे |
सुख येथेही नांदते,
तुझ्या क्रुपाभावे ||

फुल, केवडा अर्पुन,
भजावे वरद |
मोदक व करंजीचा
नारळी प्रसाद ||

टाळ म्रुदुंग भजने,
रात्र जागवती |
निराळेच रुप तुझे
कर जोडवती ||

निरोप तुला देताना,
पाणवती डोळे |
भेट नाही लवकर,
मन कळवळे ||

चैतन्याचा तुच स्त्रोत,
देव गणाधिष |
सुखकर्ता, दु:खहर्ता
ओंकार गणेश ||

Tuesday, 11 November 2008

वसंत (पादाकुलक / अष्टाक्षरी)

अष्टाक्षरी किंवा पादाकुलक छंदातला माझा एक प्रयत्न


वसंत फुलता दारी
नको पंढरीची वारी
पानापानातुन वाहे
इश्वराची क्रुपा सारी ||

फुलाफुलातुन नटे
स्रुष्टिदेवता ही न्यारी
डोळे भरुन पहावी
सौदंर्याची खाण सारी ||

भान हरपून जाते
दिसे सुंदर हे रुप
मन उल्हासित होइ
अनं आनंदित खुप ||

झाडाझाडांनाही आता
नवी पालवी फुटली
नव्या युगाच्या स्वागता
जणु कातचं टाकली ||

मन मोहरुन जाते
घेता निखळ अस्वाद
सारी देवाची किमया
आता सर्वत्र अल्हाद ||

Monday, 10 November 2008

आणखी एक देवद्वार

कडक नियम
शुद्धलेखनाचे
धोरण मिपाचे
ठरतसे ||

मिपाचे मालक
विसोबा खेचर
मारी फाट्यावर
दुढ्ढाचार्या ||

करी अट्टाहास
जर कोण येथे
जावे त्याने तेथे
खुशालच ||

मिपा नाहि तोटा
कधी प्रतिभेचा
कट्टा हा सर्वांचा
वाढतसे ||

छंद उपक्रम
सुंदर वाटता
सांगाति असता
धोंडोपंत ||

कवितेस सोपा
देवद्वार छंद
'चेतन'ही छंद
जोपासते ||

आणखी एक देवद्वार छंदातिल रचना

हवासा गारवा
घेतोय पारवा
वेध न चुकावा
निद्रेतही ||

अश्रुंचा कारवा
डोळ्यात साठवा
नाही ओघाळावा
निद्रेतही ||

किती हा फसवा
देहाचा लकवा
मान न वाकवा
निद्रेतही ||

भाषेचा गोडवा
कधी न सोडावा
हळुच डोकवा
अंतरात ||

देवद्वार छंदातिल रचना

मन हे कातरं
होई संधिकाली
प्रेमाची सावली
हरवली ||

भुक ना तहान
होइ जीव वेडा
विरहाची पिडा
ह्रुदयात ||

तुझी आठवण
भान हरपते
मन ना लागते
कशातच ||

नित्याचि चाहुल
कानात साठते
गळा दाटवते
नित्यनेमे ||

लागे हुरहुर
आता नाही भेट
दाखव तु वाट
अंधारात ||

थांबले स्पंदन
उर हा फुटला
विरह दाटला
सर्वदुर ||

तेवतो प्रकाश
मंद गाभार्‍यात
पेटवुन ज्योत
समईची ||

सुंदर ते ध्यान
डोळे साठवती
मिळे मनःशांती
काही वेळ ||

पुन्हा दिनक्रम
पुन्हा संध्याकाळ
मिळे पाठबळ
नामासंगे||

Wednesday, 5 November 2008

प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत.

"भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय."
"बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं! तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित."
"काय म्हणालास?"
" नाही, काही नाही!!! हे आपलं खुदं के साथ बातां! हे ही मिपावरुनच ढापलेलं, बर का!!" मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो.
तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा, "दादा, मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!"
"माहिते मला ते, बोलायला तर आहे ना! ते जाउ दे, मग काय लिहणार?"
"तोच विचार करतोय. हे बघ, एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय."
मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं!खाली एक ठळक अक्षरात टिप होती
"प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा!!"
आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता).
हा सांगु लागला....
तसं बघ मी कधी कविता केलीली मला तरी आठ्वत नाही त्यामुळे ते बाद. तसही मला रिक्श्यातुन उतरल्यावर मिटर बघुन किती पैसे झाले ते कळत नाही तर कवितेतला मिटर काय झा* कळणार.
त्याचं निरिक्षण आणि शब्द ऐकुन हे नक्की कळल की हा रांत्रदिवस मिपावर पडिक असणारे. मि आपलं उगाचचं बोलायचं म्हणुन म्हणलो
बरोबर आहे तु म्हणतोस ते. पण मग चारोळी तर कर आहे काय त्यात?
मला मात्र मनात चुपके चुपके मधली जुलाब जोडुन केलेली चारोळि आठ्वली. म्हणला प्रयत्न चालु आहे. मी त्याला फटु साहेबांच नाव सांगणार होतो की मदत घे म्हणुन (ट ला ट आणि र ला र जोडण्यात डॉक्टरेट केली आहे यांनी)
पण "भकारान्त शब्दांची चारोळी करायचा प्रयत्न चालु आहे" हे पुढ्चं वाक्य ऐकुन मनातं म्हणलं बर झालं फटुचं नाव नाही सांगितलं नाहितर उगाच फाट्यावर मार पडला असता. मी आपली मौनं सर्वाथ साधयेत हे जाणुन त्याच्या बोलण्याची वाट पाहु लागलो.
स्वतः बनवलेल्या एक्सेल शीटमध्ये बघुन तोच म्हणाला
लिहणाच्या द्रुष्टिने दुसरा सोपा प्रकार म्हणजे विडंबन त्यातही गझल व्रुत्त यमक नसलेली कविता किंवा त्रिवेणि उचलायची हा पण एक प्रयत्न करतोय मी. केसुसरांच्या नंतर एकच नामचिन विडंबनकार राहिल्याने कॉम्पिटिशन कमी आहे.
मग मात्र मला गप नाही रहावलं म्हणलं
बर्‍याच लोकांनी आम्हाला गझलाच जास्त आवडतात विडंबन म्हणजे दुसर्‍याच्या प्रतिभेवर एक परप्रकाशी बांडगुळ असे केसुपंथाच्या गुरुजींच्या बहुतेक विडंबनावर प्रतिसाद देउन गांगुलीसारखी त्यांना निव्रुत्ती घ्यायला लावली. त्याचा विरोध आणि त्यामुळे निर्माण झालेली संधी पाहुन बर्‍याच नवोदितांनी प्रयत्नांची शर्थ केली पण डावखुरा फलंदाज निव्रुत्त झाल्याने डावखुर्‍या फलंदाजाचीच नेमणुक होइल या नियमाप्रमाणे रंगनाथन आनंद या अतिशय प्रतिभावंत बुध्दीबळ्पटुची निवड झाली. केसुपंथाची दिक्षा घेतलेले लोक पंथाला विसरले आणि रंगनाथन यांची एकछ्त्री सत्ता प्रस्थापीत झाली. बुध्दीबळाची उत्तम जाण असल्याने या मधुशालेचा हा भाग कधी येणार असे विचारुनही यांनी वेळोवेळि कॅसलींग करुन आपली विडंबनाची सेवा अबाधित ठेवली आहे.
हा जाज्वल्ल्य इतिहास सांगित्ल्याने मला जर बर वाटतं तर म्हणतो कसा
बर झालं सांगितलस ते विडंबन टाकण्याआधी बुध्दीबळ शिकाव म्हणतो.
मी पुढे टाकलेल्या प्याद्याला त्याने एन् पास करुन मलाच मात दिली होती.
आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती मग मीच विचारलं
अजुन काही लिहण्याचा प्रयत्न चालु आहे का?
तर मुखातुन अम्रुत पाझरावे तसे स्व्रर्गीय स्वर (जे डोक्यावरुन जातात ते ) बाहेर पडले.
हे काय?
प्.पू तात्यामहाराजांचे लेख वाचुन किर्तनकलेत शास्त्रीय संगिताचा वापर कसा शक्या असे आहे आणि रॉक आन सारख्या चित्रपटात एखादं शास्त्रीय संगितावर आधारित गाणं टाकल्याने मास्तरांच्या चित्रपट्परिक्षणामध्ये काय फरक पडला असता यावर सध्या लेख चालु आहे.
ते ऐकुन फीट यायच्या अवस्थेतही मी विचारलं
ते खर आहे रे पण मगाशी जो काही आवाज काढलास तो काय होता?
सात स्वरांनी मिळुन तयार होणारा सप्तक आणि त्यात थोडिशी हिमेशबाबाच्या आठव्या स्वराचं हे मिक्श्चर आहे तुला नाही कळायचं ते. लेख वास्तव्वादी होण्यासाठी जी काही ग्रुहीतके, अनुभुती लागते ती फील करायचा प्रयत्न करतोय.
त्याचं ते विदवत्तापुर्ण विचार ऐकुन मनातच म्हणलं एकतर याची नाडी शोधायला दिली पाहिजे हा बहुतेक बर्‍याच जणांची नाडी सोडणारे. (कोणाशी पंगा घ्यायचा झाल्यास त्याचावर सोडायला उपयोगी पडेल.)
पुढे तोच म्हणाला
खमंग पाककृतींसाठी कोणाकडुन मदत घेउ?
आणि माझ्यापुढे उस्ताद ग्यानसुद्दीनचे जनक सम्राट सर्कीट ओमप्रकाश आणि हा धर्मेंद्रच्या रुपात साक्षात उभे राहिले. म्हणलं चांगला चान्स आहे एकतर हा तरी स्रर्कीट होइल नाहितर स्रर्कीट तरी अनबॅलन्स होइल. पण म्हणलं
तुला कशाला हवे रे पाककॄती?
इकडेतिकडे बघितल आणि म्हणाला
कांदापोहे खातोय सद्ध्या अरे नको नको ते प्रश्न विचारतात रे. हे करायला येत का ते करायला येत का लय टेन्शन आलयं.
इथे मिपावर एक संजिव कपुरकर काका आहेत त्यांना विचार. ( मनातच म्हण्लं हा बहुतेक चायनीज पुरणाची सोडे घालुन केलेली मिसळीची कृती लिहणार बघं )
मग मीच म्हणलं
तुझे प्रयत्न चालु ठेव अजुन काही विचारचय का?
अरे अजुन बरच प्रकार लाइनीत आहेत. एक क्रमशः लिहायचं म्हणतोय.
आणि माझ्या डोळ्यापुढे सहाशे पेक्शा जास्त चालणार्‍या चार दिवसकडून प्रेरणा घेउन एलियनवर एप्रिलमध्ये शूट केलेला बांगड्या नावाचा चित्रपट उभा राहिला. आता मला हा आणखि कितीवेळा दिवास्वप्नात प्रवास घडवणारे कोण जाणे.
पुढे तोच म्हणाला
एक भैयाकथा क्रमशः लिहाय्ची म्हणतो. माझ्या भैयाकथेची सुरवात कंदिल घेउन जाणार्‍या गबाळ्यापासुन करणारे.
मग माझ्या डोळ्यासुमार ती शहारे आणणारी कथा आणि तो कंदिलधारी शार्पशूटर जसेच्या तसे उभे राहिले. आत्ता फार वेळ मी जर याच्याबरोबर राहिलो तर हा मलादेखिल छताला चिकटवायला कमी करणार नव्हता.
हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो.
अबे भो...डिच्या आता बंद करशील का तुझ्या फाट्यावर कट्टा मारु
माझी सहनशक्ती आता संपली होती. आता खर तर मला इनोची गरज होती.
जाताजाता त्याने मला एक फोटो दाखवला त्यात यात्रीप्रमाणे त्याचाही डोक्यावर हात असलेला साक्षीदेवाने फोटोशॉपमध्ये बनवलेला संसदभवानासमोरचा लकीटाइप फोटु होता. त्याखाली शुद्द संस्कृतात लिहलेलं सातारवी भाउंची कुठलतरी सुभाषित होतं. आंणि त्यामागे शुद्दलेखनाचा फायदा या सदरात लिहलेले वेल्यांट्या बद्लुन तयार केलेले प्रा. साहेबांच्या आयडि सारखेच दिसणारे मगधी भषेतील तीन आय.डी. होते.
शेवटि त्याचं हे एव्हढ मिपा ज्ञान आणि करामती बघुन आपल्याला मिपा बद्दल किति ज्ञान आहे, अमुक अमुक लेखात किति ओळी होत्या किंवा या गझलेतील व्रुत्तात कोणती चुक आहे असे बरेच चर्चाप्रस्ताव , किंवा एखादी लघुकथा स्पर्धा आयोजित करण्याच मनात ठरवुन मी झोपी गेलो.

(समाप्त)
प्रसंगः एक नविन मराठी माणसाला मिपाबद्दल सांगताना

पुलंनी ज्यांच्यापुढे करं जोडावेत अशी महाराष्ट्रातील तीन गावं सांगितली. त्यानंतर असेच कर जोडण्यासारखे एक गाव म्हणजे मिपा. येथे (---^---) असे काहितरी कर जोडावे लागतात. तशी इतरही अनेक संस्थळ आहेत पण पुलंच्या भाषेतच सांगायचे तर ज्यांच्यपुढे करं जोडावे असे फक्त मिपाच त्याची सर इतरांना नाही. इथल्या माणसांची नावेदेखील गावचा, साहित्याचा बाज असणारि अर्थात काही अपवाद म्हणून ढोले पाटिल पॅरडाइस् सारखी इंग्रजाळलेली ब्रिटिश टिंग्या सारखी नावं पण आहेत. (पण खर सांग असली नावं पण मजेशीर वाटतात ना?)

तर तुम्हाला या गावचं सदस्य व्हायचयं का? कसं व्हायचं विचारताय, मेल्या भो**च्या बाजुला नवीन खाते बनवा दिसतं नाही काय? काय म्हणता मराठी लिहता येत नाही! मगं इथ कशाला झक मारयला आलास. हे काय तुला मुंबै वाटलं काय बै. तसे इथे प्रवेश मिळण्यासाठि खास काही त्रास नाहि हातोहात प्रवेश मिळतो. त्यामुळे अवैध मार्गाने बांग्लादेशातुन येणार्‍यांची संख्या लक्षणिय नाही. (अनेक पासपोर्ट असणारे काही जण आहेत इथे पण थोडे काहीजण परकायाप्रवेशातदेखील माहिर आहेत). इथे फार कडक असे शुध्दलेखनाचे कायदेही नाहित, पोलिस आणि प्रशासकही नाहीत. नाही म्हणायला एक ईंदिराजी आहेत पण त्यांचा वावर पाकिस्तानप्रमाणे वारंवार नसतो. काय इचारतोस मगं खर्डफळा आणि मिपा व्यवस्थीत चालतं कसं? अरे राजा थोडेफार अधिकार असलेली काही मंडळी आहेत येथे. (परत प्रशासकाचं नाव काढलस् किंवा असले फालतु प्रश्न विचारलेस तर भा* फाट्यावर मारीन... )

असो ...

तर आत्तापर्यंत तुझ्या शब्दभांडारात काही असामान्य शब्दांची भर पडलिच असेल पण लक्षात घे हे शब्द असामान्य नसुन मिपावर दैनंदिन वापराले जातात (प्रेमाने). तेव्हा त्यांचा वापर शिकुन घे. काय म्हणलास तु मिपाकर झालास! साल्या अजुन तुझं हाग्रितलं शिक्श्यान नाय झालं अन् पदविधर झालास म्हनतोस. बरं बरं मी तुला प्राथमीक शिक्श्यान देतो. अन् पुढचं! अरं माझ पण व्हायचय अजुन. बरेच प्रा. अन् मास्तर हायतं इथं. साल्या बरेच प्रश्न विचारतोस थांब तुला प्रभुदेवाच्या समुपदेशनाच्या क्लासलाचं धाडतो(काय म्हनतो हा काय प्रकार आहे?

अरं
"तुझं शिक्ष्यान किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा डोस्कं किती? तू बोलतोयस किती?"

झेपलं नाय ना...! (क्रिप्टिक हाय हे ) म्हनुन म्हनलं हे शिकुन घे. कधितरी वादविवादाच्या वेळेला उपयोगी पडंल. कसं वापरायचं ? अर हाय काय त्यात वाक्यातला दुसरा शब्द बदलायचा फक्त. कळलं कि नाय. समजेल हलुहलु. ह्यात पदवी घ्यायचि म्हणतोस अर मगं प्रभुदेवांनाच विचार की. पर कुठ्ल्याहि प्रकारच्या अर्वाचिन अथवा पदव्युत्तर शिक्ष्यान मात्र सर्कीट मास्तरांकडुनच घे. अरं ते कुंबलेसारखीच सारखीसारखी क्रिप्टिक गोलंदाजी करतात. चल आता वेळ झाली निघतो मी पुढची ओलख. क्रमशः (हा पण इथे एक कंपू आहे ). अरं थांब इथं कुठ इनो मिळतं का? च्यायला इतक्यात क्रिप्टिकपण टाकायला लागलासं

(क्रमशः)

Friday, 20 June 2008

टवाळ्क्या

आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या
गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या
लोकांना असते रोजंचं टेन्शन, ते न घेणं हेचं असतं आमचं इन्टेन्शन
त्यांना वटते आपण खूप पुढे जावे, आम्ही मात्र ठेविले अनंते तैसेचि रहावे
आमच्याकडे विषयांची कमी कधीच नसते, क्रिकेटम्ध्ये हार जीत तर होतचं असते
कट्ट्यावर बसुन आम्ही नेत्यांना शिव्या देतो, आम्ही मात्र फक्त टवाळ्क्या करतो

मनं

मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातं
मनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं...
मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखं
मनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं...

पक्षी निरीक्षण

पक्षी निरीक्षण


भंकस ही करता करता, मन माझे गुंतले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले
आळसावलेले पाय हे, पसरुन कट्ट्यावरी
इकडुन तिकडे फिरवी, ही मुंडी वरचेवरी
आज त्याचे ध्यान का, एकीवरचं थांबले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले
टक लावुन पाहताना, तोंड का वेडावले
वळुन मागे पाहताना, मन का पस्तावले
नेहमीच्या या खेळामधले, नाविन्य का हे संपले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले
नजरेत भरता शिल्प हे, हा सांड कोठून उपटला
घाम फुटुन सर्वांगाला, कंप का हा भरला
जवळ येताना पहून तो, पाय लावून पळाले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले

धुन्दी विडंबन

मूळ लेखन : "पाउस पडुन गेल्यावर" (गारवा)
पाउस ही संकल्पना बदलुन धुन्दि (अर्थात दारुची) ही संकल्पना धरुन हा विडंबनचा प्रयत्न

धुन्दी डोक्यात गेल्यावर, तन हलके हलके झाले
स्वर्गाच्या वाटेवरती, नभात तरंगत गेले
बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, हे विचार मस्त मोहाचे
मेंदुला डावलून आल्या, त्या सुप्त अंनंत इच्छांचे
सोडुन लाज सारी, पाउले ही लडखडति
धुन्दी डोक्यात गेल्यावर, त्या ओजाड रस्त्यांवरती
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी भ्रांत चित्त हरपलेला
रिझवुन मदीरा सारी, पेंगाळलेला सैतान जागा झालेला
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन लसलसता लाव्हा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन झुलझुलता झुलवा